Pune News : पुणे (आंबेगाव) : डिंभे धरणाकडून भीमाशंकरकडे निघालेल्या पत्रकाराच्या कारने पोखरी गावच्या हद्दीत अचानक पेट घेतला. याची कल्पना मागून दुस-या कारमधून येणा-या पत्रकाराच्या भावाने मोबाईलवरून दिल्याने पेटत्या कारमधील पत्रकार आणि त्याचे कुटुंबिय तात्काळ बाहेर पडले. या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. (Journalist’s speeding car caught fire)
पोखरी गावाच्या हद्दीत घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंब भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले होते. घरातीलच दोन कार असल्याने (Pune News) ते आणि त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर भीमाशंकर या ठिकाणी निघाले होते. सचिन तोडकर यांच्याकडे त्यांची डस्टर क्रमांक एमएच ४३ एएन ६९८६ कार होती. तर भावाकडे दुसरी कार होती.
डिंभे धरणावर फिरून ते भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले असता पोखरी गावाच्या हद्दीत दुपारी साडेतीनच्या दरम्यान सचिन तोडकर यांच्या कारच्या पुढील खालच्या बाजुतून अचानक धूर आणि जाळ निघू लागला.
सचिन तोडकर ड्रायव्हिंग करत असल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. मात्र, त्यांच्याच पाठीमागे असलेला त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर यांना कारने पेट घेतल्याचे दिसले. (Pune News) त्यांनी याबाबत फोन करून सचिन तोडकर यांना तात्काळ माहिती दिली.
सचिन तोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने कार रत्यावर थांबवली आणि त्यांची पत्नी, मुलगा, भाचा, दोन लहान मुली यांना बाहेर काढले. तोपर्यंत कारच्या पुढील भागात आग लागली होती. कारमध्ये असलेल्या पाण्यानेआग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपयश आले. (Pune News) तेथूनच जवळ असलेल्या हॉटेलचे मालक ज्ञानेश्वर सोळसे यांनी पाण्याचा टँकर आणून ती आग विझवली. मात्र या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :