Deccan Queen’s 94th Birthday : पुणे : मुंबई आणि पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन या रेल्वेला ९३ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने आज १ जूनला या रेल्वेचा ९४ वा वाढदिवस तुतारी वाजवून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापण्यात आला. (Deccan Queen turns 94; Celebrating Deccan Queen’s birthday by cutting a cake at Pune Railway Station)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती
यावेळी रेल्वेच्या इंजिनचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. डेक्कन क्वीनला फुलांनी आणि फुगे लावून सजवण्यातही आले होते. (Deccan Queen’s 94th Birthday) डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडत असताना पुणे रेल्वे स्थानकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची दरदरोजच्या प्रवासी संख्या मोठी आहे. नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने तसेच इतर काही कारणांमुळे रोज पुणे ते मुंबई प्रवास केला जातो.(Deccan Queen’s 94th Birthday) त्यामुळे ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच त्यांच्या या रेल्वेशी भावना जोडल्या गेल्या आहेत.
जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 – द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे.
अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे. डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. (Deccan Queen’s 94th Birthday) डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.
दख्खनची राणी…………..
महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांत १ जून १९३० ला ‘डेक्कन क्वीन’ ची सुरवात झाली. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वे दाखल करण्यात आली होती. (Deccan Queen’s 94th Birthday) ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ असेही म्हटले जाते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत ; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा