विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. या सर्व पालख्यांमध्ये श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख मानल्या जातात. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरला जाणा-या इतर सर्व पालख्या गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने जात आहेत. मात्र जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा गेली दोन वर्षे वेगवेगळ्या विषयांवरुन साधक बाधक चर्चेच्या अग्रभागी आहे. अतिशय किरकोळ कारणांमुळे या सोहळ्याचे प्रमुख स्थानिक गावक-यांना त्रास देतात, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली असून तशी चर्चा पालखी मुक्कामी असणा-या व विसावा घेणा-या गावातील नागरिकांमध्ये रंगली आहे.
(Jagadguru Santshreshtha Tukaram Maharaj Palkhi sohala head Harass to the local villagers.? ; Colorful discussion among the villagers, warning of agitation by the citizens.)
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. या सर्व पालख्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंपरेनुसार वारकरी पंढरपूरला जातात. (Loni Kalbhor) स्थानिक नागरिकांच्या बरोबरच राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागिय आयुक्त आदी सर्व सरकारी यंत्रणा, काही स्वयंसेवी संस्था, स्थानिक तरुण मंडळे पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा म्हणून जीवाचे रान करतात. वारक-यांना अन्न, पाणी, निवारा उपलब्ध व्हावा म्हणून सर्वजण झटत असतात.
‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ व “जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ यांच्या पालखी सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी असते. ‘‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ यांचा पालखी सोहळा व्यवस्थित सुरळीत आहे.(Loni Kalbhor) तर दुसरीकडे ‘’ जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज’’ यांच्या पालखी सोहळ्यात निवासस्थान, मुक्काम, विसावा, यामध्ये मागील दोन वर्षापासून अडचणी का निर्माण होत आहेत हेच समजत नाही. त्यामुळे ‘‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ हा गेल्या काही वर्षात वाद विवादामध्ये अडकत चालला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक वैतागले आहेत.
‘‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ व ‘‘ जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज’’ या दोन्ही पालख्यांचे संबंधित ठिकाणच्या नागरिकांकडून वारकरी सांप्रदाय व भक्तांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जाते. (Loni Kalbhor) ‘‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ यांची पालखी पुणे सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर, यवत मार्गे पुढे जाते. तर ‘‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ यांची पालखी हडपसरवरून दिवेघाटातून सासवडकडे रवाना होते.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा….
‘‘ जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात न थांबविण्याचा निर्णय पालखी सोहळा प्रमुखांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदा घेतला आहे. तसेच विसाव्यासाठी पालखी सोहळा उरुळी कांचन गावात न्यायचा नाही असेही सोहळा प्रमुखांनी ठरवले आहे. (Loni Kalbhor) त्यामुळे लोणी काळभोर व उरुळी कांचन परीसरातील भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा उरुळी कांचनचे सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे येणार का नाही याबाबत अजूनही नागरिकांमध्ये शंका आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) जूनला प्रस्थान होणार आहे. गुरुवारी १५ जूनला सकाळी लोणी काळभोर येथून निघून यवत मुक्कामी जाणार आहे. (Loni Kalbhor) गुरुवारी (ता. १५) दुपारी विसाव्यासाठी परंपरेप्रमाणे उरुळी कांचनचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात येत असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून पालखी सोहळ्याचे विश्वस्तांच्या विसंवादाने हा पालखी सोहळा गावात आणण्यास नकार दिला जात आहे.
दरम्यान, पालखी सोहळा विश्वस्तांनी लोणी काळभोर या ठिकाणी थांबणारा पालखी सोहळा लोणी काळभोर गावात न थांबता तो कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Loni Kalbhor) तसेच उरुळी कांचन गावात पालखी जाणार नसून सरळ पुणे सोलापूर रोडवरच अपुऱ्या जागेत विसावा घेऊन तिथून पुढे मार्गस्थ होणार आहे, अशी भूमिका पालखी सोहळा समितीने घेतली आहे.
‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ पालखीला कोणतीही अडचण नाही
‘‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’’ यांचा पालखी सोहळा व्यवस्थित सुरळीत आहे. त्या ठिकाणी कोणताही वाद नाही, विसंवाद नाही. काही मर्यादा नाहीत मग लोणी काळभोर व उरुळी कांचन या ठिकाणी दाखल होणाऱ्या ‘‘संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज’’ यांच्या पालखीला का अडचण येते याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही. (Loni Kalbhor) मात्र लोणी काळभोर व उरुळी कांचन गावातील नागरिकांमध्ये पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्कामा बाबतीत निर्णय घेणा-या संबंधितां बद्दल प्रचंड नाराजी वाढली आहे. या संदर्भात ठोस व ठाम निर्णय घेण्यासाठी लोणी काळभोर ग्रामस्थांनी येत्या रविवारी ( ४ जून) एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीपुर्वी संबंधितांनी आपले सकारात्मक निर्णय जाहीर करुन नागरिकां मधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.