Pune News : पुणे: सामान्यपणे रताळं उपवासाला खाल्ली जातात. अगदी छोटी छोटी आणि मोठी रताळीही मिळतात. पण मोठं म्हणजे फार फार तर किती मोठं रताळं तुम्ही पाहिलं असेल. अर्धा किलो, पाव किलो. पण पुण्यात असं रताळं मिळालं आहे की, त्यांचं वजन ऐकले तर थक्क व्हाल. (Abba! Heavy yams in Pune; You will be surprised to hear the weight…)
माळवाडी नेतवड येथील पंढरीनाथ बटवाल यांच्या शेतातील उत्पादन
जुन्नर तालुक्यातील माळवाडी नेतवड येथील शेतकरी पंढरीनाथ बाळू बटवाल यांच्या शेतात हे रताळं सापडले आहे. त्या रताळ्याची चांगली चर्चा रंगली आहे. (Pune News) दोन दिवसांपूर्वी बटवाल आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये रताळ्याची काढणी करत होते. त्यावेळी त्यांना हे अनोखं रताळं हाती लागलं. या रताळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
जम्बो रताळं म्हणून हे प्रसिद्ध होत आहेत. रताळ्याला पाहिल्यानंतर अबब, बाबव अशाच प्रतिक्रिया येत आहेत.(Pune News) काही जणांनी तर देवाची करणी अन् जम्बो रताळ्याची पायाभरणी असं म्हटलं आहे.
नेतवड आणि ओतूर पट्ट्यात काळी कसदार जमीन असून हा शेतकरी आपल्या शेतीत घरच्या जनावरांचे शेणखत वापरत आहे. यासोबत सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करत असल्याने पीक जोमदार येत आहे.(Pune News) ते नेहमी आपल्या शेतात रताळी लागवड करतात. पण इतकं मोठं रताळं आपण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले.
आता या रताळ्याचं वजन नेमकं आहे तरी किती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या रताळ्याचं वजन तब्बल 5 किलो 330 ग्रॅम आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : आश्रमशाळेतील पाण्याच्या टँकरचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच