Pune News : पुणे : पोलीस असल्याचा बनाव करत एका 26 वर्षीय तरुणीची सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील बालेवाडीत घडला आहे. बँक अकाउंटची चौकशी करायची असल्याचे सांगत तरुणीकडून पैसे ट्रान्स्फर करून ही फसवणूक केली आहे. (In Pune, pretending to be a policeman, a girl was cheated)
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याप्रकरणी तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. प्राथमिक तपासात आरोपी दिल्ली भागातील असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवीला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीना अज्ञात चोरट्याने सुरुवातीला फोन केला. व तुमच्या नावे एक पार्सल पाठवले आहे, ते जर तुम्ही पाठवले नसेल तर लगेचच पोलिसांना कळवा’ असे सांगितले. त्यांनतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये फोन ट्रान्स्फर करतो असे सांगून तरुणीचा फोन बनावट मोबाईल नंबरवर ट्रान्स्फर केला. (Pune News) पोलीस बोलत असल्याचे भासवून तरुणीला स्काईप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून तरुणींकडून आधार कार्ड मागितले. त्यानंतर आधार कार्ड मागितल्यानंतर चार गुन्हेगार तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करत असल्याचे चोरट्याने तरुणीला सांगितले.
दरम्यान, तुमच्या बँक अकाउंटची चौकशी करायची आहे असे सांगून सगळे पैसे ट्रान्स्फर करावे लागणार असल्याचे सांगून तपास पूर्ण झाल्यांनतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील असे सांगत तरुणीच्या खात्यातील एकूण ६ लाख ९९ हजार ५२९ रुपये ट्रान्स्फर करून घेतले. (Pune News) झालेला हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तीने पोलीसात धाव घेतली व या प्रकरणी माहिती दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
Pune News : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून तरुणाची खडकवासला धरणात उडी घेत आत्महत्या