Junnar News : पुणे : जुन्नर येथील शासकीय आश्रमशाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर लाचेची मागणी केल्या प्रकरणी एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. शासकीय आश्रशाळेतील पाण्याचे टँकरचे बिल मंजुर करण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापकाने पाच हजार रुपयाच्या लालेची मागणी केली. या मुख्याध्यापकास लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (The headmaster asked for a bribe to approve the water tanker bill in the ashram shala)
ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अरुण दगडू महाकाळ (वय ५७ शासकीय आश्रमशाळा, मुखालने, ता. जुन्नर, जि. पुणे.) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. (Junnar News) याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय असून, ते शासकीय आश्रमशाळा, मुथाळने येथे पाण्याचे टँकर पुरवतात. दरम्यान या टँकरचे बिल मंजुर करण्यासाठी मुख्याध्यापक महाकाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. (Junnar News) त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचेकडे मुख्याध्यापक महाकाळ यांनी शासकीय आश्रमशाळा, मुथाळने येथे पाणी पुरवठा केल्याचा मोबदला म्हणून कार्यालयातील कर्मचारी यांचेसाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. (Junnar News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग…