उरुळी कांचन (पुणे)- उरुळी कांचन चौकीत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने, उरुळी कांचन हद्दीतील शिंदवणे रस्त्यावर भरबाजारात एका हमालाला अर्वाच्च्य शिवीगाळ करत बेदम मारहान केल्याची घटना पुढे आली आहे. मारहाणीची घटना बुधवारी (ता. 10) सांयकाळी पाच वाजनेच्या सुमारास घडली असुन, या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
भारती होले हे त्या मारहाण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असुन, त्या उरुळी कांचन पोलिस चौकीत मागिल कांही महिण्यापासुन कार्यरत आहेत. तर किशोर निवृत्ती गरड (वय-35, रा. उरुळी कांचन (बस स्टॉपच्या मागे) ता. हवेली, मुळगाव परांडा जि. उस्मानाबाद) हे मारहाण झालेल्या हमालाचे नाव आहे. शिंदवणे रस्त्यावर एका किराण्याच्या दुकाणात किराणा माल उतरवत असतांना, अचानक आलेल्या भारती होले यांनी विनाकारण मारहान केल्याचा आरोप किशोर गरड यांनी केला आहे.
दरम्यान किशोर गरड यांनी उरुळी कांचन पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर धायगुडे यांची गुरुवारी सकाळी बारा वाजनेच्या सुमारास भेट घेतली असुन, घडलेल्या माहिती घेण्याचे काम पोलिसांच्याकडुन चालु आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असुन, भारती होले यांच्या कामकाजाबाबत उरुळी कांचन परीसरात यापुर्वीही तक्रार येत होत्या.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
मारहान झालेले किशोर गरड व शिंदवने रस्त्यावरील नागरीकांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, किशोर गरड हे हमालीचा व्यवसाय करतात. बुधवारी सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास शिंदवने रस्त्यावरील एका दुकानात किराणा माल खाली करत असतांना, भारती होले त्या ठिकाणी आल्या, रस्त्यात टेंपो का उभा केला असे म्हणत, टेंपो ड्रायव्हर च्या ऐवजी भारती होले यांनी गरड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत, लाथा बुक्क्याने मारहान करण्यास सुरुवात केली.
किशोर गरड यांनी त्याही परीस्थितीत माफी मागण्याच्या प्रयत्न केला. तसेच आसपासच्या मागरीकांनीही होले यांना मारहान करण्यापासुन अडविण्याचा प्रयत् केला. मात्र भारती होले कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने, त्यांनी गरड यांना मारहान सुरुच ठेवली. नेमका त्याचवेळी केोणीतरी मारहाणीचा व्हिडीओ काढला व सोशल मिडीयावर व्हायरलही केला.
भारती होले यांच्याबाबत मोठी नाराजी…
दरम्यान भारती होले यांच्या कामाच्या पध्दतीबाबत उरुळी कांचन परीसरात मोठी नाराजी आहे. त्यांच्या बाबत यापुर्वीही नागरीकांच्याकडुन तक्रारी येत होत्या. मात्र कालच्या घटनेने होले यांच्या दादागिरीबाबतचा कळस गाठला आहे. किशोर गरड यांनी चक केली होती तर त्यांच्यावर कायदेशिर कारण्याची गरज होती. मात्र हम करो सो कायदा या न्यायाने वागणाऱ्या भारती होले यांच्यावर वरील घटनेबाबत वरीष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करतात, याकडे उरुळी कांचन नागरीकांचे लक्ष लागुन राहिले आहे.