Minister Radhakrushna wikhe patil News : पुणे : दौंड व हवेली तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार राहुल कुल यांनी त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. (MLA Rahul Kul drew the attention of Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil to various issues in Daund and Haveli talukas.)
आवश्यक कार्यवाही करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश
दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत हरकती व सूचना मागविण्याचा प्रस्तावास मान्यता मिळावी अशी मागणी कुल यांनी केली. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. अशी मागणी केली (Minister Radhakrushna wikhe patil News) याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रांत व तहसीलदार यांचे समवेत बैठक घेऊन, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
दरम्यान, भामा आसखेडच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या परंतु पुनर्वसनासाठी राखीव करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील राखीव हा शेरा काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करून, बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. (Minister Radhakrushna wikhe patil News)
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हवेली कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर बाजार समिती आवार, मांजरी उपबाजार समिती पार्किंग तसेच पेरणे उपबाजार आवाराकरिता महसूल विभागाची जागा मिळावी अशी मागणी केली.(Minister Radhakrushna wikhe patil News) त्यानुसार उपलब्ध असलेल्या जागांचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात यावेत. अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, सह सचिव रमेश चव्हाण, श्रीराम यादव, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, प्रांताधिकारी संजय आसवले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक रोहीदास उंद्रे, गणेश घुले, सुदर्शन चौधरी, स्वप्निल उंद्रे, दौंडचे भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, शाहू भोसले आदी उपस्थित होते. (Minister Radhakrushna wikhe patil News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..
Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..