Kolhapur Crime : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावरील गोकुळ-शिरगाव परिसरात पोलिसांनी छापा कारवाई केली. या कारवाईत तब्बल १२ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
किरण कोकाटे आणि स्वप्निल कोरडे अशी आरोपींची नावं आहेत. (Kolhapur Crime) पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले
गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करत होते. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापेमारी करत दोन आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळं कोल्हापुरात खळबळ उडाली असून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Kolhapur Crime) पोलिसांनी जप्त केलेली दारू ही गोव्यातून आणली गेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील शिरगावच्या एका हॉटेलमध्ये अवैधरित्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शिरगाव परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकची चौकशी केली. त्यावेळी त्यात १२ लाखांची विदेशी दारू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.(Kolhapur Crime) त्यानंतर पोलिसांनी दारुचा साठा व संबंधित वाहनाला जप्त केलं. तसेच या प्रकरणातील दोन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur Crime : धक्कादायक!!! सख्ख्या भावाने काढला बहिणीचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून..!
Kolhapur News : दोन सख्ख्या भावांनी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घेतला जगाचा निरोप…!