हनुमंत चिकणे
Ashadhi Wari : लोणी काळभोर, (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन लाखो वारकरी देहू ते पंढरपूरला पायी वारी करतात. मात्र, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील पुर्वीच्या अडचणी जैसे थे असल्याने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापुर्वी सुटणार का? याही वर्षी प्रवास खडतरच होणार असा प्रश्न लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांना पडला आहे.
महामार्गाला कोणी वाली उरला आहे की नाही? स्थानिक नागरिकांसह वारकऱ्यांचा सवाल..
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी यायला महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असूनही पुणे-सोलापूर पालखी मार्गावरील अनेक छोटी मोठी कामे प्रलंबित पडलेली आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उच्च अधिकान्यांसह शासकीय अधिकारी नियोजनाच्या बैठका घेत आहेत. (Ashadhi Wari) मात्र असले तरी पुणे-सोलापूर महामार्गावरील पालखी मार्गातील काहीच काम गतवर्षीही झाले नाही व यंदाही होण्याची शक्यता नाही. या महामार्गाला कोणी वाली उरला आहे की नाही? आणखी किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार, असा सवाल स्थानिक नागरिकांसह वारकऱ्यांकडूनही केला जात आहे.
१० जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला ठिकठीकाणी वाढती अतिक्रमणे, साईडपट्ट्या उखडलेल्या असून, बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, (Ashadhi Wari) तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे यावर्षीही संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची वाट बिकटच ठरणार आहे.
बुधवारी (ता. १४ जून) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे येत आहे. टोलवसूलीच्या काळात महामार्गाची दुरूस्ती, देखभाल होत होती. त्यानंतरच्या काळात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वारक-यांना अनेक समस्यांना समोर जावं लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Ashadhi Wari) कारण महामार्गावर दुतर्फा काटेरी झुडुपे, माती व वाळूचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वारांचा धडकून किंवा घसरून अपघात होवून गंभीर जखमा होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्या मध्ये एक लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु हळूहळू त्या गायब झाल्या. त्या परत टाकण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्या मध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फूटपाथ तयार करण्यात आला. (Ashadhi Wari) जाळ्यांची चोरी व्हायला लागली तसेच त्यामुळे खालचा फूटपाथही आपोआपच तुटला आहे. याची दुरूस्ती करण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही.
सदर महामार्गाचा ताबा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे (NHAI) हस्तांतरीत केला. तत्पूर्वी कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील जाळ्या पुन्हा बसवल्या परंतू ब-याच ठिकाणच्या जाळया अवघ्या काही दिवसांत गायब झाल्या आहेत. तुटलेले लोखंडी ॲगल पदपथावर येत असल्याने ते धोकादायक ठरत आहेत.
याचबरोबर टोल बंद झाला तरी आजतागायत दोन्ही टोलनाक्यावर टोल वसूली करण्यासाठी उभारण्यात आलेले बुथ जैसे थे आहेत. तसेच स्पिडब्रेकर काढण्यात आलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणची विद्युत व्यवस्था खंडित करण्यात आल्याने वाहनचालकाला याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहण आदळून नुकसान होते. यामुळे हे बुथ व स्पिडब्रेकर तात्काळ काढून टाकावेत या मागणीने जोर धरला आहे.
दरम्यान, याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (Ashadhi Wari)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : देहूमध्ये वारीच्या तयारीला वेग; वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक कामे घेतली हाती
Collector Visited Palkhimarg : वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये : जिल्हाधिकारी