Aakurdi Accident : पिंपरी-चिंचवड : निष्काळजीपणातून एका 3 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कारचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवल्यामुळे गाडीची धडक बसली व दुचाकीवरील मुले खाली पडली. समोरून वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपचे मागचे चाक अंगावरून गेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. (The carelessness of the driver cost the life of the toddler)
आकुर्डीतील गावठाण चौकानजिक घडली दुर्घटना
ही धक्कादायक घटना आकुर्डीतील गावठाण चौकाजवळ रविवारी (दि.21) रोजी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Aakurdi Accident)
शिवेंद्र आदेश विचारे (वय 3) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकऱणी मुलाच्या वडील आदेश विष्णू विचारे (वय 42 रा.निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून महिंद्रा सुप्रो (एमएच 14 केए 6409) व बोलेरो पिकअप (एमएच 14 केए 8267) यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aakurdi Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या दुचाकीवरून खंडोबा माळ येथील खंडोबाच्या दर्शनाला त्यांचा मुलगा व मुलगी हिच्यासह जात होते. (Aakurdi Accident) यावेळी महिंद्रा सुप्रो गाडीच्या चालकाने त्याच्या गाडीचा दरवाजा हा अर्धवट उघडाच ठेवला होता. त्या दरवाज्याला फिर्यादीच्या गाडीची धडक बसली. यात गाडीवरील फिर्यादीची मुले रस्त्यावर पडली. यावेळी समोरून वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपचे मागचे चाक शिवेंद्र च्या अंगावरून गेले. यात शिवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही वाहन चालक तेथे न थांबता तेथून पळून गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri Crime : पिंपरी-चिंचवड हादरले! चिखली येथे भरदिवसा झालेल्या गोळीबारात सोन्या तापकीर ठार…
Pimpri News : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान!
pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास