Pune News : पुणे: मुंबई-सातारा (एनएच-4) रस्त्यावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला वाहनचालक चांगलेच त्रासले आहेत. मात्र आता या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार आहे. या चौकातील काम आता अंतिम टप्प्यात आले असून, 90 टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पूल वाहनचालकांसाठी जुलै अखेर सुरू करण्यात येणार आहे. (Chandni Chowk in Pune will breathe freely; The flyover will be commissioned by the end of July)
पूर्वी चांदणी चौकात वाहनांची मोठी कोंडी होत होती, त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत असे. मात्र, प्रशासनाने मागील वर्षी येथील अरुंद पूल पाडून रस्ता रुंदीकरणासह नवे रस्ते, क्रॉस रोड यांसारखी कामे सुरू केली. (Pune News) ती सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली असून, 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकातील मार्गालगत असलेल्या सिमेंटच्या भितींवर, भूमिगत रस्त्याच्या भिंतींवर विविध प्रकारची भित्तिचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे येथून जाताना परदेशात आल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. (Pune News)
नव्वद टक्के काम पूर्ण
असा आहे कामाचा आलेख..
सध्या चांदणी चौकातील 90 टक्के काम पूर्ण झाले असून, 30 जुलैअखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता 397 कोटींपर्यंत खर्च आला आहे. जुलैअखेरनंतर हा पूल वाहनचालकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
पूल 150 मीटर लांबीचा व 32 मीटर रुंदीचा आहे.
150 मीटर लांबीच्या व 32 मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण 22 खांब उभारले जात आहे.
22 पैकी बावधनच्या बाजूचे 10 खांब उभारले गेले आहेत.
एनडीएच्या बाजूचे 12 खांब उभारण्याचे काम सुरू
रॅम्प 3 व रॅम्प 7 चे 20 टक्के काम अपूर्ण आहे.
एनडीए व बावधनला जोडणार्या पुलासाठी 93 गर्डर वापरले जात आहेत. गर्डरचे हे काम सुमारे महिनाभर चालणार आहे.
येथील एकूण कामांपैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
केवळ पुलाचे काम बाकी आहे.
येत्या एक ते दीड महिन्यात पूल बांधण्याचे काम पूर्ण होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना