Loni Kalbhor Police news : लोणी काळभोर : लोणी काळभोर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या समय सुचकतेमुळे होल्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे प्राण वाचवले. (Loni Kalbhor Police news) ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या झेंडे यांच्या जागेत आज शनिवारी (ता.२०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कवडीपाट टोलनाक्याजवळील घटना….
ज्ञानोबा बडे (वय-५२, रा. लोणी काळभोर) असे प्राण वाचविलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Loni Kalbhor Police news) तर या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव भैय्या (संपूर्ण नाव व पत्ता व पत्ता समजू शकले नाही) असे आहे. भैय्यावर मांजरीतील योग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे यांच्या जागेतील अनधिकृत होल्डिंगवरील फ्लेक्स बदलण्यासाठी भैय्या आणि त्याचा मित्र शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चढली होती. (Loni Kalbhor Police news) फ्लेक्स बदलताना, त्यातील भैय्याला २२ केव्ही विद्युत प्रवाह असलेल्या तारांना चिकटल्याने जोरदार धक्का बसला. आणि भैय्या वरच होल्डिंगवरच लटकला.
या घटनेची माहिती मिळताच, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ज्ञानोबा बडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Loni Kalbhor Police news) बडे यांनी तातडीने होल्डिंगवर चढून चिकटलेल्या भैय्याला त्वरित खाली उतरविले.
पोलीस कर्मचारी बडे यांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या भैय्याचे प्राण वाचले. (Loni Kalbhor Police news) बडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लोणी काळभोर परिसरात अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई कधी – नागरिकांचा सवाल…?
पुणे-सोलापूर महामर्गावर हडपसर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन यादरम्यान शेकडो अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होल्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. (Loni Kalbhor Police news) या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई का केली जात नाही असा सवाल सामान्य नागरिक करू लागले आहेत.
प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जातात…
एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकाचौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायकरित्या जाहिरातीचे पोल उभारले जात आहेत. (Loni Kalbhor Police news) काही ठिकाणी तर पथदिव्यांच्या खांबांवर हीटलेस बांधले आहेत. परंतु, याकडे कारवाईच्या नावाखाली प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवणे जात आहेत.
महावितरणाला जाग कधी येणार…
पूर्व हवेली विद्युत प्रवाहांच्या जवळ मोठ्या प्रमाणत अनधिकृत होल्डिंग तयार केलेल्या आहेत. या होल्डिंग मालकांकडे महावितरण कारवाईचा बगडा का उगारीत नाहीत. (Loni Kalbhor Police news) महावितरण दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तरच महावितरणाला जाग येईल का? या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.