Morgaon Crime : बारामती: पुण्यातील एका निवृत्त पोलिसाच्या पत्नीला प्लॉट विकल्यानंतर त्यांनी केलेले तारेचे कुंपण काढून टाकत पुन्हा त्याच जागी प्लॉटिंग करत फसवणुकी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Morgaon Crime) हा प्रकार बारामती तालुक्यातील मोरगाव येथे घडला. (Cheating of Retired Policeman in Plotting; The incident took place at Morgaon in Baramati taluka)
वैभव पांडुरंग तावरे, पांडुरंग तावरे, अमित लक्ष्ण शेंडगे (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे), गणेश बाळासाहेब दगडे (रा. कासुर्डी, ता. भोर), फक्रुद्दीन अलीमहमंद बाबाजी, नफिसा फक्रुद्दीन बाबाजी, खोमेजा फक्रुद्दीन बाबाजी आणि अली महमंद बाबाजी (रा. फक्रीहील्स, लुल्लानगर, कोंढवा, वानवडी रोड, पुणे) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Morgaon Crime) याप्रकरणी सुजाता रमेश सणगर (रा. आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील प्रकार…
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती 2017 मध्ये पोलिस खात्यातून निवृत्त झाले. 2018 मध्ये हडपसरच्या श्री महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या वैभव तावरे, पांडुरंग तावरे, अमित शेंडगे यांनी मोरगाव येथील गट क्रमांक 132-2 मधील 11 गुंठ्याचा प्लॉट फिर्यादी यांना 8 लाख रुपयांना दिला. ऑगस्ट 2018 रोजी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचे खरेदीखत झाले. (Morgaon Crime)
बाबाजी परिवार या जागेचे मूळ मालक होते. त्यांनी फिर्यादीला खरेदीखत करून दिले. धनादेशाने त्यांना रक्कम देण्यात आली. त्यानंतर तावरे व शेंडगे यांनी सात-बारा, आठ अ उतारा तसेच खरेदीखताचे मूळ पेपर्स राहिलेली रक्कम दिल्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यात दिले. (Morgaon Crime) बाबाजी परिवाराने त्यांना प्लॉटिंगच्या ठिकाणी नेत मोजमाप करून दिले.
फिर्यादीने त्या जागेला तारेचे कुंपण घालून पती व मुलाचा मोबाईल क्रमांक लिहीत तेथे फलक उभा केला. मात्र त्यानंतर त्याच जागी प्लॉटिंग करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे.