Loni Kalbhor Police | लोणी काळभोर, (पुणे) : मागील सहा ते आठ महिन्यांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढतच चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे लोणी काळभोर पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला धाक आता कमी होताना दिसत आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे मात्र नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. यामुळे हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना लोणी काळभोर पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.
गाड्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात….
पुणे – सोलापूर महामार्गावर कोणी बंदुकीचा धाक दाखवून गाड्या पळवून नेत आहे. कोणी फायनान्स वाले आहोत असे सांगून गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. दुचाकी, चारचाकी या गाड्या तर चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलीस ठाण्यातील काही पोलिसांच्या समक्ष केक कापले जात आहेत. फटाके फोडले जात आहे. मध्यरात्री शहरात वाढदिवसाला केक कापण्याची तर जणू प्रथाच झाल्यासारखे वाटत आहे. दिवसाढवळ्या शहरात सार्वजनिक ठिकाणी मारहाण होणे तर आता नित्याचेच झाले आहे.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या, तसेच काही ठिकाणी खून झाले आहेत. झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. दिवसाढवळ्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घरफोडी झाली होती. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु असून लोणी काळभोर पोलीस मात्र काहीच होत नसल्याचा आव आणीत आहेत. सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवीत आहेत.
अनेक घरफोड्या व वाहने, चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच..!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली मात्र त्या वाहनांचा व चालकांचा आजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच आहेत.
नेटवर्क संपले ; डीबी कुठंय?
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते? असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे सुरक्षारक्षकाच्या कानपटीला पिस्टल लावून चारचाकी कारची चोरी करून चोर निघून गेले मात्र या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. तर लोणी काळभोर पोलीस मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल