BJP News | पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपने देशव्यापी विशेष जनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरवले आहे. त्याचा आरंभ पंतप्रधान मोदी ३० मे रोजी करणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
यापुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या अभियानाची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मे रोजी पंतप्रधान मोदी हे आणखी एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. याखेरीज संपूर्ण देशात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ५१ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.”
यामध्ये केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी भाग घेतील. तसेच एकूण ३९६ लोकसभा मतदारसंघांत सार्वजनिक सभा घेतल्या जाणार आहेत. यात संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदारही सामील होणार आहेत.
देशभरात एकाचवेळी पत्रकार परिषदा…
भाजपने २९ मे रोजी संपूर्ण देशात विविध ठिकाणी एकाचवेळी पत्रकार परिषदा घेण्याचे ठरविले आहे. राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी तेथील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे विरोधी पक्षनेते या पत्रकार परिषदांना संबोधित करतील. यानंतर हे सर्वजण त्याच दिवशी मान्यवरांशी वार्तालाप करून मोदी सरकारने बजावलेल्या कामगिरीची माहिती देतील.
अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत राबविले जाणार…
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात संपर्क अभियान राबविण्याचे भाजपने ठरवले आहे. हे अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत राबविले जाणार आहे. मोदी सरकारची धोरणे आणि विविध पातळ्यांवर मिळवलेले यश यांतर्गत जनतेपर्यंत पोहोचविले जाणार आहे. तसेच एक लाख खास परिवारांशी संपर्क साधला जाणार आहे. संबंधित प्रदेशातील मान्यवर खेळाडू. कलाकार, उद्योगपती, शहीद आणि अन्य प्रसिद्ध परिवारांशी भाजपकडून संपर्क साधला जाणार आहे अशी माहितीही यावेळी भेगडे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
BJP News : शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे..!
Politics | राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमते ? अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर