हनुमंत चिकणे
CBSE Result | उरुळी कांचन (पुणे) : केंद्रीय उच्च मध्मिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षा २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के तर बारावीचा निकाल हा ९९ टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांनी दिली.
यामध्ये दहावीच्या परिक्षेमध्ये प्रथम आर्या गोविंद मुरकुटे ९७.२० टक्के, द्वितीय अर्जुन सिंग नेगी ९४.२० टक्के, तृतीय ओम प्रतापसिंह चोरघे ९२.४० टक्के गुण प्राप्त केले.
तसेच बारावी विज्ञान शाखेतून प्रथम सोहम सचिन आखाडे ९० टक्के, तर वाणिज्य शाखेतून प्रथम मोनिका भागिरथ जाजश या विद्यार्थीने ८० टक्के गुण मिळविले आहेत.
उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने राखली असून त्यामध्ये दहावीचे ८४ पैकी ८४ विद्यार्थी पास झाले आहेत तर विज्ञान शाखेचे ३४ पैकी ३३, तर कॉमर्स शाखेचे ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता दहावीचे ७ विद्यार्थी हे ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. तर ८० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले २६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव सोपानराव कांचन, विद्यालयाचे प्राचार्य राजीकुमारी लक्ष्मी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी कौतुक केले.
Health Care : ‘या’ उपायांनी डबल चीन घालवा आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा