अजित जगताप
Satara News | वडूज : फुले- शाहू- आंबेडकर – साठे यांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी सर्व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. विशेष बाब म्हणजे उत्सव महापुरुषांच्या विचारांचा नवयान महाजलसा च्या माध्यमातून शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी यांनी शाहिरीतूनच प्रबोधनाचा वसा जपला आहे.
वडूज नगरीतील सिद्धार्थ नगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांमध्ये खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या योगदानाची आठवण झाली.
खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये युगपुरुषांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी अनेक पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते स्वयंपूर्ण सहभागी होत आहेत. संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने एक मनोरंजनाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या नवयान महाजलसा खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात चांगला कार्यक्रम झाल्याने हुतात्म्यांची नगरी धन्य झाल्याचे मानण्यात येत आहे.
वडूज येथील बाल भीम शाहीर समर्थ खुडे तसेच विविध स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ डोळ्याचे पारणे फेडत होता. या लहान स्पर्धकांचे कौतुक पाहून पालक वर्ग ही खुश झाले होते. प्रारंभी नवयान महाजलसाची सुरुवातीला बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर भीम गीताच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज नदाफ, नगरसेविका शोभा बडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक बैले, नगराध्यक्ष मनीषा काळे, डॉ. नारायण बनसोडे, रंजीत गोडसे, कुणाल गडांकुश, सोमनाथ जाधव, शशिकांत पाटोळे, गणेश चव्हाण, धनंजय चव्हाण, विश्वास जगताप, सत्यवान कमाने, धनराज आवळे, एस के झेंडे, आप्पाजी खुडे, संतोष भंडारे, उमा झेंडे, कांताबाई बैले, प्रा. जे .टी. धुळप व वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले, बी आर जगताप, सादिक मुल्ला, अजित रायबोले, रोहित कांबळे, महादेव सकट, अशोक वाघमारे, अभय नलावडे, प्रथमेश रायबोले, अभिजीत सरतापे ,राजाराम खुडे, संतोष यादव, लता रायबोले, वनिता बैले, मंगल रायबोले, ॲड. राजू चव्हाण, धनसिंग सोनवणे, अजित नलावडे, पत्रकार अजित जगताप, सुरज पोतदार, देवानंद थोरात, मुकुंद माने यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद संगीतमय आस्वाद घेतला.
युगपुरुषांच्या विचाराचा वारसा जतन करणाऱ्या बाल भीमसैनिक समर्थ खुडे याच्या विशेष कौतुकाने वडूज नगरीमध्ये खऱ्या अर्थाने पुरोगामी चळवळीचे बीज अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न केला आहे. हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद जगदाळे यांनी केले
दरम्यान, माझ्या भिमान बुद्धाला पेरले,,, वंचित बहुजन गोंघळ,,,, मागं नो जागा हो,, लहुजी वस्ताद सारखा वाघा हो,,,,,, रमाची ओवी,,,,, भिमाच पिल्लू जाग असावं,,, या प्रबोधनात्मक गीतांच्या वेळी अनेकांनी ताल धरला. अंगावर शहारे आणणारी शब्द रचना व ढपावरील निनादाने सर्वच भिमगीते प्रेरणादायी ठरली आहेत.