Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामतीतील मेंढपाळाची मुलगी आता देशाचं नेतृत्त्व करणार ; दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर घातली यशाला गवसणी..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 May 2023, 13:54

पुणे Baramati News : यहोवा मेंढपाळ माझा, कोणाची भीती मला? सांभाळी जो त्याच्या मेंढरां, सोडील का तो मला? निवांत पाण्याशी नेई, जिवा देई ताजवा, नीतीच्या वाटेने चालवी, दिशा देई पावलां.

नीतीच्या वाटेने चालवी, दिशा देई पावलां. या गीतांच्या ओळीप्रमाणे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा दिशा देण्याचे काम करुन त्यांचा साभाळ करतो. रानावनात फिरुन त्यांच्या जीवावर गुजरान मेंढपाळ करत असतो. बारामती तालुक्यातील तरडोली येथील अशाच एका मेंढपाळाच्या मुलीने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर बेसबॉल संघाच्या कर्णधारपर्यंत आकाशाला गवसणी घातली असून ती आता आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहे.

 रेश्मा शिवाजी पुणेकर असे मेंढपाळ  कन्येचे नाव : 

मेंढपाळ कन्या रेश्मा शिवाजी पुणेकर असे तिचे नाव आहे. सध्या सर्वत्र तिच्याच संघर्षाचे कौतुक होत आहे. लहानपणापासूनच शेळ्या मेंढ्या राखण्याचे ती काम करीत असे. यावेळी शेळ्या मेंढ्याच्या बकऱ्यांच्या मागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडण्यात रेश्मा रमत असे. पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाची खेळाडू नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार बनली आहे.

 

रेश्मा हिने आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने हे चीन आणि हाँगकाँग देशात खेळले आहेत. तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले आहे. २८ राज्यस्तरीय सामने तसेच ४ गोल्ड मेडल, ६ रजत पदक, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणे तिचे ध्येय होते. हाँगकाँग, चीनसारख्या देशात जाऊन दोनवेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हाँगकाँग देशात होणाºया तिसºया आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पधेर्साठी लागणाºया खचार्साठी तिच्याकडे आर्थिक चणचण आहे. रेश्मा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शारिरीक शिक्षण विभागात एमपीएड या वर्गात शिकत आहे. स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मेडल, प्रमाणपत्र, आदी यशाचा ठेवा ठेवण्यासाठी तिच्याकडे लाकडी कपाट सुद्धा नाही.आधुनिक उपकरणे, साहित्य तिच्या घरामध्ये नाही. तरी ती जिद्दीने खेळत आहे.
रेश्माच्या स्वप्नपूर्तीसाठी तिच्या आई-वडीलांनी सर्व बकऱ्या, रान सुद्धा विकले. फक्त दोन बैलजोडी, काळ्या आईच्या उत्पन्नाच्या आशेवर रात्रीचा दिवस करीत आहेत.

खपणारे आई- वडिल काबाडकष्ट करीत आहेत. परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी आर्थिक मदतीची आणि पाठिंब्याची गरज आहे. जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावणाऱ्या रेश्माला येत्या काळात आहार, खेळण्याच्या साहित्यासाठी व इतर खर्च कसा करायचा, हा प्रश्न आवासून उभा आहे. तिला हा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे रेश्मा हिच्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

लहानपणापासुनच खेळाची आवड होती.शाळेत या खेळाची ओळख झाली.आठवीतच न्यु इंग्लीश स्कुलमध्ये राष्ट्रीय खेळ खेळण्याची सुरवात झाली.अकरावीत शारदाबाई पवार महाविद्यालयात प्रवेश घेतला.महाविद्यालयाने मला चांगला ‘सपोर्ट’ केला. त्या ठीकाणी मोठे मैदान मिळाले.त्यामुळे चांगला सराव घेतला. खासदार सुप्रिया सुळे, कृषि विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांची मदत झाली असे रेश्माने पत्रकारांशी बोलताना सांगितले. आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी मिळण्याची गरज तिने व्यक्त केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Baramati News : जुन्या वादातून तिघांचा चुलता-पुतण्यावर चाकू, तलवारीने प्राणघातक हल्ला ; तिघांना बेड्या, माळेगाव परिसरातील घटना…

 

Baramati News : कालीचरण महाराजांनी बारामतीत केलेल्या ”त्या” वक्तव्याबाबत गुन्हा दाखल…

Baramati News : नीरा नदीपात्रात हजारो मृत माशांचा खच ; मृत पावलेले मासे विकण्यासाठी नागरिकांची चढाओढ..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

Pune News : पोलिस कर्मचार्‍याला जमावाकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण ; जुन्नर तालुक्यातील घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.