Satara News | पाचगणी, (सातारा) : मागील काही दिवसांपासून पर्यटन नगरी पाचगणी शहरातील काच बावडी नाका, जयभवानी सोसायटी व पारशी पाॅंईट परिसरात हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक नळाच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून आले आहेत. नागरिकांना पुरविण्यात आलेले पाणी बघून नागरिकांचा माथाच ठणकला. ऐन उन्हाळ्यात दुषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जंतूयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिक व महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या विरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित होत आहे.प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी निवेदनाद्वारे संबंधित परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, परिसरातील पिण्याचे पाण्यामध्ये सांडपाणी मिक्स होत असून तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. मागील पंधरा दिवसापासून अनेक वृद्ध नागरीक व लहान मुडे, डायरीया व जुलाबाने त्रस्त असून कावीळ साथ पसरणेची शक्यता आहे. याबाबत आपणास अनेकदा तोंडी व समक्ष भेट्न विनंती केली असतानाही कसलीही हालचाल आपणाकडुन झालेली नाही.
दुषीत पाणी पिण्यामुळे जर एखादा इसम आजारपणामुळे दगावल्यास याची संपूर्ण जबाबदारी जीवन प्राधिकरणाची राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची प्रत पाचगणी नगरपरिषद व पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाची टोलवाटोलवी..!
जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाच्या टोलवाटोलवीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
जीवन प्राधिकरणाचे अधिकारी म्हणतात पालिकेचा संबंधित चेंबर ओव्हर फ्लो झाल्यावर पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन मध्ये दूषित पाणी येते पालिकेने चेंबरचे काम करावे.आणि पालिका प्रशासनान म्हणते जीवन प्राधिकरणाने पाइपलाइनचा लिकेज् काढून घ्यावा या टोलवाटोलवीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून काही नागरिकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत पुणे प्राईमशी बोलताना माजी उपनगराध्यक्ष प्रविण बोधे म्हणाले, “बाजारपेठेतील वसंत जॅम समोर राज्य मार्गावरील चेंबरमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये लिकेज निर्माण झाल्याने होणाऱ्या दुषित व जंतूयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल न घेतल्यास नागरिकांना आंदोलन करावे लागेल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pachgani | पाचगणी पोलीसांना ”बिर्ला शक्ती सिमेंट” ने भेटस्वरुपात दिले बॅरिकेड्स