Chandrakant Patil पुणे : समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करावे. असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. (Chandrakant Patil)
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठक संपन्न
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Chandrakant Patil : जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil : मी अजितदादांसाठी धावपळत आलो;अजित दादा गायब झाले.. ; चंद्रकांत पाटील म्हणाले