Pune Crime : पुणे : अनैतिक संबंधातून पत्नी प्रियकराबरोबर (wife running away) पळून गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पत्नीने पळून जाताना घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व (wife stole the cash, gold ornaments) माहेरकडील घरातील रोख रक्कम लोकांना न सांगता चोरुन नेली. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ मध्ये तसेच १८ एप्रिल २०२३ रोजी (This happened) घडला. (Pune Crime News)
याबाबत कर्वेनगरमध्ये राहणार्या एका ४३ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद श्रीमंत वाले (वय २९, रा. कर्वेनगर) व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीने आईच्या प्रियकराने आपला विनयंभग केल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
शिवानंद याने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून त्यांच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे येणे जाणे सुरु केले. असा प्रकार दोन तीन वेळा करुन तिच्या मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. ही बाब कोणाला सांगू नको, म्हणून तिला धमकाविले होते.
दरम्यान, शिवानंद याच्याबरोबर फिर्यादीच्या पत्नीने अनैतिक संबंध निर्माण केले. त्यातून ती घरातून पळून गेली. जाताना तिने घरातील ५० हजार रुपये रोख, १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून ३० हजार रुपये तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीच्या मुलीने वडिलांना आपलाही त्याने विनयभंग केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रायकर अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा :
Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा
Pune Crime : ऑनलाइन मागवला मोबाईल अन् खोक्यात आल्या साबणाच्या वड्या ; तिघांना अटक