Loniknd News : लोणीकंद, (पुणे) : हॉटेल व्यावसायासाठी ( place on lease for hotel business) भाडेतत्वावर जागा घेण्याचे भासवत भाडेकराराच्या जागी खरेदी खतावर सह्या घेऊन (agreement under the pretense) ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (cheating) केल्याप्रकरणी अष्टापूर (ता. हवेली) (Ashtapur) येथील पाच जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand police station) गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नितीन अंकुश मेमाणे (वय- ४२), आशा नितीन मेमाणे (वय – ४०), आकाश संपत कोतवाल (वय – ३०), अनिकेत सुरेश कोतवाल (वय – २९), संतोष उल्हास साळुंके (वय – ३२, सर्व रा. अष्टापूर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. याप्रकरणी खंडेराव गेनबा भोरडे (वय ७४, रा. पिंपरी सांडस, अष्टापूर फाटा, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पिंपरी सांडस भागात जागा आहे. त्यांच्या ११. ६० आर असेलेल्या जागेपैकी ५ आर क्षेत्र हॉटेल व्यावसायासाठी भाडेतत्वावर घेतो, असे आरोपीनी भासावले. या जागेसाठी दरमहा २५ हजार रुपये भाडे व ९ लाख रुपये डिपॉझिट देतो असे सांगितले.
दरम्यान, या व्यवहाराचा भाडेकरार नामा करण्यासाठी त्यांनी तक्रारदर जेष्ठांना लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १५ फेबु्वारी २०२३ रोजी नेले. तिथे मात्र भाडेकराराऐवजी त्यांच्या जागेचे खरेदीखत करुन त्यावर त्यांची सही घेऊन फसवणूक केली. तक्रारदार यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली. जेष्ठाला डोळ्याने कमी दिसत असल्याचा फायदा घेत ही फसवणूक केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा