Pimpri Crime पिंपरी : व्हाट्अॅपवर मेसेज करुन नोकरीची चांगली संधी आणि युट्युबवरील व्हिडीओ लाईक केल्यास चांगले पैसे मिळतील, या आमिष दाखवून एका कंप्यूटर इंजीनियरला तब्बल 19 लाखांना गंडा घातला. हा प्रकार 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत घडला.
अमर अनिल लोमटे (वय 23, रा. थेरगाव) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
अनोळखी व्यक्तीने फिर्यादींना व्हाट्अॅपवर मेसेज केला. तुम्हाला जॉब ऑफर देण्यात येईल. युट्युबवर व्हिडीओ लाईक करून प्रत्येक व्हिडिओला 50 रुपये मिळतील. व्हीआयपी सदस्य झाल्यास प्रत्येक व्हिडीओला 100 रुपये देण्यात येतील. व्हीआयपी सदस्य होण्यासाठी प्रीपेड टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून फिर्यादीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी तीन टप्प्यात तब्बल 18 लाख 80 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरले. त्यांनतर त्यांना कोणताही नफा अथवा जॉब न देता आरोपींनी संपर्क बंद केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!