दीपक खिलारे
Indapur | इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्यातर्फे सन 2022-23 साठीचा जिल्ह्यास्तरीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार बावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रदान करण्यात आला.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ताटे व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर यांनी शनिवारी (ता.29) हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे जिल्हा परिषदेमध्ये उत्साहात पार पडला.
बावडा प्राथमिक आरोग्य केद्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur | अवकाळी पावसाने पिटकेश्वर येथील पानमळ्याचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
Indapur : भिमाई आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीदिनी अभिवादन