दीपक खिलारे
Election | इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत, शेतकरी विकास पॅनलने अठरा जागांपैकी बिनविरोध चार जागा करीत उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात विरोधी पॅनलला धूळ चारत 14 जागांवर घवघवीत मताधिक्य मिळवित बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली.
इंदापूर येथे कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात शनिवारी (दि.२९) इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल, निवडणूक निर्णय अधिकारी जे.बी. गावडे यांनी जाहीर केला. सकाळी उशिरा प्रत्यक्ष मतमोजणीस सुरूवात झाल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
विजयी उमेदवाराचे नाव, कंसात मिळाळेली मते…
कृषि पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ –
1) आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे (मते २२३७),
2) मनोहर महिपती ढुके ( मते २०३८ ),
3) संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर ( मते २२८७ ),
4) संदीप चितरंजन पाटील ( मते २२२७ ),
5) दत्तात्रेय सखाराम फडतरे ( मते २२७१ ),
6) विलास सर्जेराव माने ( मते २२४४ ),
7) रोहित वसंत मोहोळकर ( मते २२७५ ),
तर कृषिपतसंस्था महिला प्रतिनिधी मतदार संघातून सहा उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये मंगल गणेशकुमार झगडे ( मते २१२६ ), व रुपाली संतोष वाबळे ( मते २१५२ ) हे उमेदवार विजयी झाले आहेत. व कृषिपतसंस्था भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून तीन उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये आबा गणपत देवकाते ( मते २२५६ ) विजय झाले. तसेच कृषिपतसंस्था इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघातून तुषार देवराज जाधव यांनी २३७६ मताधिक्य घेत विजयाची पताका फडकवली.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून मधुकर विठोबा भरणे यांनी ८६६ मते मिळवत विक्रमी विजय मिळवला व याच मतदारसंघातून संतोष नामदेव गायकवाड यांना ७६७ मते मिळवून विजय मिळवला आहे.या मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार अनिल बबन बागल (मते ७८९) मताधिक्य घेत घवघवीत विजय मिळवला आहे.
दरम्यान, विरोधी पॅनलचे पराभूत उमेदवार अशोक घोगरे ( ६६२ मते ) वगळता इतर उमेदवारांना मताच्या वरती आकडा गाठता आला नाही. परंतु कोणताही राजकीय पाठिंबा नसताना देखील विरोधी पॅनलने मारलेली मोठी मजल लक्षणीय आहे.
निवडणुकीत धनशक्तीचा विजय -महारुद्र पाटील
एकीकडे दोन आमदार व अनेक भावी आमदार एकत्र आले असताना दुसरीकडे आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना देखील केवळ तालुक्यातील सामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीर उभी राहिल्याने आम्ही या निवडणुकीत चांगल्या प्रकारे मताधिक्य घेऊ शकलो. जनशक्ती पुढे धनशक्ती जिंकली अशी प्रतिक्रिया विरोधी स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे प्रमुख महारुद्र पाटील यांनी निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : संविधानामुळे देशात सामाजिक सौख्य टिकून : नंदकुमार शहा
Indapur News : हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार