Pune Crime पुणे : मी तळेगावचा भाई आहे तू मला पैसे मागतो म्हणत हातात कोयता घेत दोन जणांनी एका चायनीज सेंटरवर गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. चायनीज सेंटर चालकाने चायनीज पैसे मागितल्यावर दोघांनी दमदाटी करत पैसे देण्यास नकार दिला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक येथे गुरुवारी (दि.27) रात्री अकराच्या सुमारास घडला.
याप्रकरणी चायनीज सेंटर चालक अक्षय धनंजय भोसले (वय 28 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीसांनी जय प्रविण भालेराव व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार…!
तळेगाव दाभाडे येथे जिजामात चौकात तक्रार यांचे फ्रेन्डस चायनीज सेंटर आहे. या सेंटरवर आरोपी यांनी ट्रिपल राईसची ऑर्डर दिली. त्यानंतर चायनीज चाकलाने 130 रुपये होतील असे सांगितले. त्यावेळी तू मला ओळखत नाही का, मी तळेगावचा भाई आहे, तू मला पैसे मागतो. असे आरोपी जय म्हणाला व त्यांनी हातातील कोयता काढून तक्रारदार चायनिज चालकास दमदाटी केली व दुकान बंद करण्याची धमकी दिली. आरोपींच्या हातात कोयता बघून तक्रारदार व आसपासच्या दुकानदारांनी भितीपोटी दुकाने बंद केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.