Election | मंचर, (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम हेही निवडून आले आहेत. माजी सभापती निकम यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
मंचर बाजार समितीच्या १८ जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना-भाजप युतीने आपला पॅनेल उभा केला होता. मात्र, युतीच्या पॅनेलला पराभावाचा सामना करावा लागला आहे. बाजार समितीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या हेात्या. उर्वरीत पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यातील १४ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला असून बंडखोर निकम हे निवडून आले आहेत.
माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वळसे पाटलांपासून दूर गेलेल्या एकाही नेत्याला आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत विजय मिळविता आलेला नव्हता. अपवाद फक्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा होता. मात्र, शिवाजीराव ढोबळे, अरुण गिरे यांना नेत्यांना पुढच्या निवडणकीत पराभवच पत्कारावा लागला होता. मात्र, निकम यांनी ती परंपरा खंडीत केली आहे.
दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निकम हे मागे हेाते. राष्ट्रवादीचे सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जसजशी मतमोजणीच्या फेऱ्या होत गेल्या तसतशी निकम यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळविला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Election : पुणे बाजार समिती निवडणुक ; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी