सागर जगदाळे
Bhigwan Crime भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधामांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावच्या माजी उपसरपंचासह एकाने हे संतापजनक कृत्य केले आहे. मुगली गर्भवती राहण्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी हा मुलीवर अत्याचार केले.
याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) व रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यासह अट्रोसिटी दाखल केली आहे. रमेश यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
‘मला तुझ्या बरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, हे नाही करू दिले तर तुझे बाहेरच्या मुलांबरोबर प्रेम संबंध आहेत असे तुझे आई-वडिलांना खोटे सांगून तुझी बदनामी करीन’ अशी धमकी देऊन बदनामी करण्याची धमकी नराधांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीला दिली.
या भितीतून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहीली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन आरोपीपैकी एक गावचा माजी उपसरपंच असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!