Crime येरवडा, (पुणे) : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर नातेवाईकांनीच फुटपाथवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात २५ आणि २६ एप्रिल च्या रात्री हा सर्व प्रकार घडला. हि घटना घडली आहे.
याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी या भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात त्या कुटुंबासह राहतात. २५ एप्रिलच्या रात्री त्या जेवण करून फुटपाथवर झोपल्या होत्या.
दरम्यान, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुसंखेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध केले. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : व्हिडीओ लाईक करणे तरुणाला पडले नऊ लाखांना ; दुप्पट रक्कम मिळण्याच्या आमिषाचा ठरला बळी
Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार