Pune Crime पुणे : तुझ्यासाठी काय पण असे म्हणत प्रेयसीसाठी काही करण्याची तयारी प्रेमात वेडा झालेल्यांची असते. काही वेळेसे टोकाचे पाऊल देखील उचलले जाते. अशीच एका घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीसोबत राहताना अडथळा ठरत असल्यामुळे नवऱ्याने आपल्याच बायकोचे हात-पाय बांधून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या जखमी झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पती समीर लतीप पठाण आणि त्याच्या प्रेयसीविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावातील बनकरवस्तीमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..!
समीरचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, प्रेयसीसोबत राहत असताना बायको अडथळा ठरत होती. यामुळे आपल्या दोघांना एकत्र राहायचे असेल तर हिला मारून टाकावे लागेल, असे म्हणत प्रेयसी आणि नवऱ्याने बायकोलाच मारून टाकण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी राहत्या घरात प्रेयसी आणि समीरने बायकोचे हातपाय पकडले. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर चाकून सपासप वार केले.
अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. आळंदी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पतीनेच काढले त्या क्षणाचे व्हिडीओ अन नातेवाईकांना दाखविण्याची पत्नीला दिली धमकी