Health पुणे : जागरण, चुकीचा आहार, वातावरण यांसारख्या अनेक कारणांमुळे ॲसिडिटीची समस्या निर्माण होते. वेळीच या समस्येवर उपाय केले नाही तर याचे शारीरिक आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात.
जाणून घ्या ॲसिडिटीच्या समस्येवर घरगुती उपाय –
१. आयुर्वेदानुसार जिरे पचनासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे औषधी जिरे पाचक रस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ॲसिडिटी आणि अपचनाचा समस्येपासून तुमचा फायदा होतो. जिऱ्याचे पाणी पिल्याने ॲसिडिटी दूर होण्यास मदत होते.
२. ॲसिड रिफ्लेक्स आणि हार्टबर्नच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यात लॅक्टिक ॲसिड भरपूर असते जे ॲसिडिटी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. रोज एक ग्लास ताक पिल्याने ॲसिडिटीची समस्या दूर राहण्यास मदत मिळेल. ताक पोट थंड ठेवल्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
३. ॲसिडिटी आणि पोटाच्या अन्य असमस्यांवर नारळ पाणी अत्यंत गुणकारी उपाय ठरतो. नारळ पाण्याने आपली अपचनाचा समस्या दूर होते. यात फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. तसेच याने पित्त नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज नारळ पाणी पिणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
४. पुदिना ॲसिडिटी अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे पुदिना पाण्यात टाकून तसेच चहामध्ये टाकून पिल्यास त्याचा भरपूर फायदा होतो. ॲसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्याचे पाणी पिल्याने भरपूर फायदा होतो.