Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखे पर्यंत मुदतवाढ…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 9:38

पुणे Pune News : राज्याच्या युवा धोरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षाच्या पुरस्काराकरीता (Pune News)  जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणारे युवक, युवती व संस्था यांना अर्ज करण्यासाठी ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pune News) असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कळविले आहे. (Pune News)

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा किती?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावी. जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव असावे. पुरस्कार हा विभागून दिला जाणार नाही किंवा मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कारार्थीच्या कार्याचे सबळ पुरावे आवश्यक असून पुरस्कार दिल्यानंतर दोन वर्ष क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्था पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत आणि किमान पाच वर्ष कार्यरत असावी. संस्थेने स्वयंस्फूर्तीने कार्य केलेले असावे.

पुरस्काराच्या मूल्यांकनासाठी युवा अथवा नोंदणीकृत संस्थाचे ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य विचारात घेतले जाईल. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य असावे. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, जनजाती व आदिवासी भागात कार्य केलेले असावे.

 

शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मेस प्रोत्साहन देणारे, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपटी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य, साहसबाबतचे कार्य आदी क्षेत्रातील कार्य असावे.

दरम्यान, पुरस्काराचे स्वरुप युवक व युवतींसाठी गौरवपत्र, सन्मानपत्र व प्रती सदस्य १० हजार रुपये व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मान चिन्ह रक्कम ५० हजार रुपये असे आहे.

उमेदवारांनी मुलाखती व कार्याची पीपीटीद्वारे सादरीकरण केलेल्या कामाची सीडी व इतर सबळ पुरावे पृष्ठांकन करुन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, स.नं १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर, येरवडा पुणे- ४११००६ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जाच्या विहित नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Pune News : कृषि पुरस्कारांसाठी ”या” तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लोणी काळभोर येथील प्रहार विद्यार्थी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवराज मनोज काळभोर याला कार्यक्षम विद्यार्थी युवा नेतृत्व हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान..!

पाचगणी येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे यांना “भास्कर भुषण पुरस्कार” ; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Health : ॲसिडिटीच्या समस्येवर घरगुती उपाय, जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.