हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (Election) अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलला मिळणारा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे. (Election) आम्ही कुठल्याही एका राजकीय पक्षाशी संबंध नसतानाहि आमचे नेते विकास दांगट यांच्यावर प्रदीप गारटकर यांनी संबंध नसताना अन्याय केला आहे. यामुळे उद्याची निवडणूक एकतर्फी जिंकू असा विश्वास के.डी. कांचन व हवेलीतील ज्येष्ठ नेत्यांनी लोणी काळभोर येथे व्यक्त केला आहे. (Election)
लोणी काळभोर येथे पत्रकार परिषद संपन्न
राष्ट्रवादीचे नेते तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. डी कांचन बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी संचालक राजाराम कांचन, राजेंद्र टिळेकर, माजी सभापती प्रकाश जगताप, आदि उपस्थित होते.
यापुढे बोलताना के. डी कांचन म्हणाले,” ज्या लोकांचा सहकाराशी काहीही संबंध नाही अशा लोकांना विरोधी पॅनेलने संधी दिली आहे. त्यामुळे विजय आमचाच आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्याशी आम्ही नव्वदच्या दशकांपासून आहोत. व मरेपर्यंत राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणार आहोत. त्यामुळे सहकाराच्या निवडणुकीत काही मतभेद झाल्याने आम्ही आमच्या विचाराचे लोक उभे केले आहेत.
माजी सभापती प्रताप गायकवाड म्हणाले, ” राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला समोर पराभूत दिसून येत असल्याने विकास दांगट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष गारटकर यांना कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही. गारटकर हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कारवाई करण्याचा अधिकार हा पुणे शहर अध्यक्षांचा आहे. त्यांचा नाही. तसेच सहकारी निवडणुकीत कोणतही राजकीय पक्ष गट-तट तसेच पक्षीय राजकारण केले जात नाही. जर चांगल्या माणसांवर अशी कारवाई केली तर पक्षाला पुढील काळात नक्कीच फटका बसणार आहे. तसेच पवार साहेबांच्या विचारांशी आम्ही कायम एकजूट राहणार आहोत.
मुळशी बाजार समितीला १२ कोटीची मदत..
एकेकाळी मुळशी बाजार समितीला हवेली बाजार समितीने १२ कोटींची मदत केली आहे. तसेच त्यावेळी हवेली मुळशी अशी एकत्र बाजार समिती करण्याचा निर्णय काही तत्कालीन नेत्यांनी घेतला होता. तिथे जमले नाही त्यानुसार काही हवेली तालुक्याबाहेरील स्वयंघोषित नेत्यांनी स्वतःच्या फायद्याकरीता पुन्हा हवेली-पुरंदर बाजार समिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
यशवंतची जमीन बाजार समिती घेणार?
यापूर्वीही स्थानिक राजकारणाशी संबंधित अशा अनेक निवडणुका राजकीय पक्ष व गट तट न पाहता झाल्या आहेत. शेतकरी विकास आघाडी पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार आहेत. त्यामध्ये भाजपा २, शिवसेना ठाकरे गट २, तर राष्ट्रवादीचे ११ उमेदवार आहेत. हे उमेदवार तसेच पॅनेल विजयी झाल्यास थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी यशवंत सहकारी कारखान्याची १०० एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी मोठा उपबाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे हवेलीचे वैभव असलेला यशवंत कारखानाही सुरु होण्यास मदत होणार असून बाजार समितीचीही आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘त्या’चार उमेदवारांचे अर्ज कायम…