Chandrakant Patil पुणे : राष्ट्रावादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार मध्यंतरी नाॅट रिचेबल असल्याच्या बातम्या चांगल्या गाजल्या होत्या. अजित पवार अचानक गायब झाल्याने ते भाजप सोबत असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. हाच धागा नेमका पकडत मी अजितदादासाठी धावपळत आलो…अजित दादा आले की पन्हा गायब झाले, असा मिश्किल सवाल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक…!
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक नियोजित केलेली होती. या नियोजित बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते.
बैठकीच्या काही वेळे पूर्वी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोचले. त्यावेळी त्यांनी गाडीतून उतरताच त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. ”अजित दादा आले आहेत, का की आज देखील गायब झाले.” या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी अवाक् झालेल्याचे पहायला मिळाले.
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची आज व्हीआयपी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हय़ातील सर्व आमदार उपस्थित राहणार असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार हे नेहमीच कोणताही कार्यक्रम किंवा बैठक असो ते वेळेच्या अगोदर उपस्थित असतात. ते लक्षात घेता भारती विद्यापीठ येथील कार्यक्रम वेळेत आटोपून चंद्रकांत पाटील हे व्हीआयपी सर्किट हाऊस येथे अकरा वाजून चाळीस मिनिटाला आले.
समोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले की, अजितदादा आले का ? अजितदादा नाही आले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी अजितदादासाठी धावपळत आलो आहे. आज पुन्हा गायब झाले की काय असं मिश्किलपणे म्हणताच एकच हशा पिकला.