Pune Crime तळेगाव दाभाडे, (पुणे) : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचविण्यात दुंबरे येथील एनडीआरएफ पथकाला यश आले आहे. ही घटना तळेगाव एमआयडीसी जवळील जाधववाडी धरणात मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
आदित्य शरद राहणे (वय -२१) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. भीमाशंकर दिनेश मठपती (वय २१), आदित्य निळे (वय २१) असे वाचविण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
भीमाशंकर मठपती, आदित्य राहणे, आदित्य निळे हे तिघे तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. तिघेही जाधववाडी धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या च्या सुमारास फिरण्यासाठी आले होते. तिघे मित्र जाधववाडी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात उतरले.
दरम्यान, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य राहणे हा पाण्यात बुडून मृत झाला. त्याला तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला तब्बल २३ लाखांचा गंडा