Pune University | पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचा तिडा सोडविण्यासाठी अभाविप पुणे च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात चाललेली व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ट्रॅफिक जाम आंदोलन करून या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना घेऊन पुणे विद्यापीठात अभाविप मार्फत अनेकदा निवेदन देण्यात आली मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही विद्यापीठ प्रशासनाने केली नाही. इतकेच नव्हे तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर परवानगी नसताना अश्लील भाषेत एका युवकाने रॅप साॅंग चे शुटींग केले.
अशा प्रकारचे शुटींग सुरक्षा व्यवस्थेच्या गहाळ कामाला दर्शवते. या शुटींग संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर कडक कार्यवाही करावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परिषदेतील प्रवेश प्रलंबित आहेत या संदर्भात प्रशासनाने लवकर उपाय करावा. परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमधील चुका तत्काळ दुरूस्त कराव्या.
स्पोर्ट स्टेडियम चे उद्घाटन होऊन देखील विद्यार्थ्यांना ते वापरण्यास बंदी आहे, ते स्टेडियम लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेऊन आज दिनांक २४ एप्रिल ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात चालू असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत “संविधानिक पद्धतीने” आंदोलन केले.
विद्यापीठाच्या या पवित्र परिसरात अश्लिल रॅप साॅंग चे व्हिडिओ शूटिंग होणे हे अतिशय निंदनीय आहे, अभाविप याचा निषेध करते, व विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात लवकरच कार्यवाही करावी व इथून पुढे असे प्रकार परिसरात होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे असे अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे बोलले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे जर विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्या जबाबदारी कडे त्यांचे लक्ष केंद्रित करून देण्यासाठी अभाविप कधीही मागे पुढे बघणार नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासन सोडवत नसल्यास प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल असे वक्तव्य अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केले.
याठिकाणी विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.