राहुलकुमार अवचट
Bhimthadi Conference | यवत : भीमथडी मराठी साहित्य परिषद व मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता.दौंड ) येथे दुसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
संमेलन २७ व २८ मे २०२३ असे दोन होणार…
संमेलन २७ व २८ मे २०२३ असे दोन दिवस होणार आहे. संमेलनाच्या संयोजकांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त राजाभाऊ जगताप, डॉ.भालचंद्र सुपेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे, दीपक पवार, बाळासाहेब मुळीक, रविंद्र खोरकर, सुशांत जगताप, विजय तुपे, सुरेश वाळेकर, बाळकृष्ण काकडे, आनंदा बारवकर, कैलास शेलार, अरविंद जगताप, राहुल यादव आदी उपस्थित होते.
भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन, नृत्य अविष्कार व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कलावंत यांनी ९८८१०९८४८१, ८८०५५११०६०, ९८५०२०६९७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे. आवाहन भीमथडी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat News | यवत येथून १० वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण..!
Yavat | माणकोबा वाडा फाटा बनला ॲक्सिडेंट पॉइंट ; सिग्नल बसवण्याची ग्रामस्थांकडून मागणी