Market Yard पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधील माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीसाठी मार्केट यार्डमध्ये Market Yard बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज गुरवारी (ता. २०) फळ, भाजीपाला, पान बाजार येथील सर्व संघटनांनी एकत्रत येत मार्केट यार्ड कडकडीत बंद ठेवले आहे.
या बंदला बाजार घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
बेकायदेशिर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
हे गुन्हे बेकायदा असून अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच भविष्यात खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने कोणीही कारवाई करण्यास धजावणार नाही. त्यामुळे खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी करत सर्व संघटनाच्या वतीने करण्यात आली. याच मागणीसाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले आहे.
या बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, अडते यांच्यावर दाखल झालेले ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे खोटे आहेत. ते तातडीने मागे घ्यावेत. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरूद्ध (बापू) भोसले यांनी माध्यमांना सांगितले आहे.