Pune Crime | पुणे : पुण्यातून विधीसंघर्षीत बालके बालसुधारगृहाच्या भिंतीला शिडी लावून पळून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
पुण्यात अल्पवयीन विधीसंघर्षित बालकांना सुधारण्यासाठी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू या बालनिरीक्षक केंद्रात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारी आणि गर्दीचा फायदा घेऊन चार विधीसंघर्षीत बालके बालसुधारगृहच्या भिंतीला शिडी लावून पळाली.
दरम्यान, पळून गेलेले चारही मुले हे विविध गंभीर गुन्ह्यातील सहभाग असलेले विधीसंघर्ष बालक असल्याचे समजते. अलीकडील काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला