NET Exams | पुणे : बोपगाव (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्याचा मुलगा नवनाथ फडतरे हा राष्ट्रीय प्राध्यापक पाञता अर्थात नेट परिक्षेत उतीर्ण झाला आहे. फडतरे याने राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा तिसऱ्यांदा विक्रम रचला आहे. त्यामुळे फडतरे याचे पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात भरभरून कौतुक होत आहे.
एनटीए मार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षांचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आले. या परीक्षेत नवनाथ फडतरे यांनी संरक्षण आणि सामरिक शास्ञ ( डिफेंन्स आणि स्ट्रेंटेजिक स्टडी) हा विषय निवडला होता. या विषयात फडतरे याने यश संपादन केले आहे.
इंडीयन इंट्यिट्युट ऑफ टॅक्नोलॉजी अर्थात आय.आय. टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी प्राप्त…
नवनाथ फडतरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर अकरावी- बारावीचे शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सासवड येथील वाघीरे महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. इंडीयन इंट्यिट्युट ऑफ टॅक्नोलॉजी अर्थात आय.आय. टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
नवनाथ यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. बंधू अॅड. दत्ताञय फडतरे हे जिल्हा व सञ न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत. आईचे शिक्षणासाठी प्रोत्साहन व बंधू राकेश यांचे सहकार्य होत असल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नवनाथ यांचा शैक्षणिक आलेख आणि गरुडझेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे .
दरम्यान, कोणताही क्लास न लावता आय.आय.टी. प्रवेश, गेट परिक्षा तसेच यापुर्वी इतिहास, आता संरक्षण आणि सामरिक शास्ञ विषयात नेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या आय .आय. टी गुवाहाटी, आसाम राज्य येथून ” इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” मध्ये पीएचडी करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!