Pune Crime पुणे : भाजी मार्केटमध्ये लिंबु विक्री करणार्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान मार्केटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये घडला.
विनयभंगाच्या आरोपाखाली कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासकासह २० ते २५ जणांवर विनयभंगासह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मार्केटयार्डमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत एका ४५ वर्षीय महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासक मधुकांत गरड, दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले व इतर २० ते २५ जणांवर विनयभंग व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी महिला या भाजी मार्केट येथे लिंबु विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी मधुकांत गरड याने फिर्यादी महिलेला मारहाण करुन त्यांच्या लिंबुच्या मालाची चोरी करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन येथे येऊन धंदा करुन काय मार्केट नासवत आहे, काय असे म्हणाला.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोक तेथे येऊन फिर्यादी यांचे लिंबुच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन मार्केटमध्ये येऊन २० ते ३० लोकांना चिथावणी देऊन फिर्यादी यांच्या अंगाला हात लावून अश्लिल बोलला. एके दिवशी फिर्यादी या लिंबु विक्री करत असताना मधुकांत गरड याने त्यांच्याकडे पाहुन अश्लिल हावभाव त्यांच्या छातीच्या खाली हात लावून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे तपास करीत आहेत.