Shindvane Accident | उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गतिरोधकामुळे होणाऱ्या अपघाताची मालिका सतत सुरूच असून एका महिलेलाही या गतीरोधकामूळे आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
अर्चना संदीप खळदे (वय – ३२, रा. देवकरवाडी, ता. दौड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना खळदे व त्यांचे पती संदीप खळदे हे वळती (ता. हवेली) येथील यात्रेसाठी आले होते. संध्याकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वळतीवरून देवकरवाडी या ठिकाणी निघाले होते. यावेळी शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत आले असता पती संदीप खळगे यांना सदर रस्त्यावरील गतिरोधक दिसून आला नाही.
गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी हि त्या गतीरोधकावरून उंच उडाली यामध्ये पाठीमागे बसलेल्या अर्चना खळदे या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांना मोठी दुखापत झाली तसेच त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
सदर ठिकाणी झालेल्या अपघाताची माहिती सदर रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराला समजले असता त्याने एका दिवसात मोठ्या उंचीचा गतिरोधक साफ करून नव्याने त्या ठिकाणी कमी उंचीचा गतिरोधक बसविला आहे. पारगाव सालू मालू येथून गरोदर महिलेला तिच्या माहेरी प्रसुतीसाठी सोडवण्यासाठी चाललेली जीप या उंच स्पीड ब्रेकर वरून आदळून आपटल्याने महिलेला त्याच गाडीमध्ये वैद्यकीय मदतीशिवाय प्रसुती होण्याची घटना घडली होती. तसेच वारंवार सदर ठिकाणी अपघात होत असून पोलीस प्रशासन ठेकेदाराला पाठीमागे घालीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. अपघात होऊ नये, म्हणजे ज्या पद्धतीने उंच गतिरोधक आहेत, त्याच गतिरोधकाने अनेकांचे बळी गेले. काही जणांना अपंगत्व आले. ठेकेदार व पोलीस यांच्या संगनमताने आणखी किती बळी घेणार अशा चर्चा नागरिक करू लागले आहेत. तसेच यापूर्वीही याच प्रकारच्या स्पीड ब्रेकर वरून अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस काय करवाई करतात याकडे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गतिरोधक अगोदरच लहान केला असता तर..!
अपघात होऊ नये तसेच वाहने सावकाश जावे म्हणून सदर ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले होते. मात्र, अपघात झाल्यानंतर ठेकेदाराने काही वेळातच जेसीबी आणून मोठा गतिरोधक सपाट केला. अगोदरच गतिरोधक कमी केला असता तर सदर ठिकाणी होणारे अपघात टळले असते तसेच महिलेचा जीव वाचला असता अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.
मनाला वाटेल तसे गतिरोधक..!
स्पीड ब्रेकर बनवताना ठेकेदार व स्थानिक नागरिक त्यांच्या मनाला वाटेल तशा आकाराचे गतिरोधक बनवून घेतात. शासनाचे गतिरोधक बनवण्यासाठीचे काही नियम आहेत. या नियमांची पायमल्ली करून ग्रामीण भागात गतिरोधक बनवले जातात. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात ही बाब ही गंभीर आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Accident : सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीच्या बैलगाडीला अपघात ; एक बैल जखमी
Pune Accident : ह्रदयद्रावक ! खेळता खेळता तीन वर्षाच्या चिमुकलीला काळाने हिरावून नेले