राहुलकुमार अवचट
Yavat News | पुणे : खामगाव येथील परप्रांतीचा खून करून फरारी आरोपीला यवत गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
पिंटू अशोक गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
३१ मार्च रोजी खामगाव येथील कुणाल सदाशिव कवडे यांच्या गोठ्यात काम करत असताना पिंटू अशोक गायकवाड याने मुकेश उर्फ मुक्तार यादव (वय ४५,रा धरमपूर,उत्तर प्रदेश ) याचा एका अज्ञात कारणाने धारदार हत्याराने वार करून गळा चिरून खून केला होता. तर रामकुमार यादव (वय ४४ , रा डिग्गी उत्तर प्रदेश) याला गंभीर स्वरूपात जखमी केले होते.
याबाबत यवत पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता…
आरोपी पिंटू हा फरार असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ.अंकित गोयल यांनी आरोपीला पडकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही तसेच गोपनीय बातमीदाराकडे चौकशी करत असताना यवत गुन्हे शोध पथकाला आरोपी पिंटू हा रावणगाव, खडकी, ता. दौंड या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याला सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले असून त्याचे वर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड,अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप , गणेश कुतवळ,मारुती बाराते यांच्या पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat News : अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत