(Hadapsar News )हडपसर : हडपसर पोलीसांनी मोठी कारवाई करत १४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणत १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलीस वाहनचोरी Hadapsar News प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक इसम संशयीतरित्या दुचाकीसह मिळून आला. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. यातूनच सदर घटना उघडकीस आली आहे.
परशुराम ऊर्फ परश्या शिवाजी मोरे वय २४ वर्ष रा. सध्या मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर जिल्हा पुणे मूळगाव, मु.पो. कलहिप्परगा ता. अक्कलकोट जिल्हा सोलापुर अशी आरोपीविषयी माहिती समोर आली आहे. आरोपी हा मोलमजुरीचे काम करतो.
१४ गुन्हे उघडकीस…!
आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण १४ गुन्हे उघडकीस झाले असून कि.रू. १० लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १४ गुन्हे उघडकीस आले असून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे, पोनि (गुन्हे) विश्वास डगळे साो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समिर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, सचिन रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.