Vande Bharat Express पुणे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन सरळ कोणत्याही शहरात जात नाही. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. लवकरच पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट हैद्राबादला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेसने दोन शहरे हैदराबादला जोडण्यात येणार आहे. यापैकी एक ट्रेन हैदराबाद ते बंगळुरूपर्यंत धावणार आहे. तर दुसरी पुणे ते सिकंदराबाद अशी असणार आहे. यामुळे पुणे शहर थेट हैदराबादला वंदे भारत एक्सप्रेसने लवकरच जोडला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये काय सुविधा आहेत
१)या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
२)जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
३)लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
४)मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
५)अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
६)मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
७)या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी