Hadapsar | पुणे : पूर्व हडपसर – वाघोली भागासाठी नवीन स्वतंत्र महापालिकेसाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे आता हडपसरकरांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
नवीन महापालिका होण्याचे नियोजित होत असल्याने सर्व राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण…
आता हडपसर महापालिका ”ब” दर्जाची असावी यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पूर्व भागाच्या विकासासाठी ही महापालिका झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडत यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार राजकीय नेते व विविध संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. राज्य सरकारने पूर्व हडपसर ही स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर येथे मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, हडपसर भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले आदी उपस्थित होते.
हडपसर लगत गावांच्या विकासासाठी ‘ब’ दर्जाची महापालिका होण्यासाठी मी सातत्याने विधानसभेत प्रश्न लावून धरला आहे. पूर्व भागाच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे. असे यावेळी आमदार तुपे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक