Balu Mama | कोल्हापूर : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादातून कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील फ्री स्टाइल हाणामारी झाली.
राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सोमवारी येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर फ्री स्टाइल हाणामारी झाली. गावचे सरपंच विजय गुरव यांना यावेळी धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला.
पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही…
परंतु याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.देवस्थानचे कार्याध्यक्ष असलेले राजाराम मगदूम यांचे निधन झाल्यामुळे नवीन कार्याध्यक्ष निवड करण्यावरून मतप्रवाह निर्माण झाल्याने ट्रस्टीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
धर्मादाय कार्यालयाजवळ दोन्ही गटांत हाणामारी झाल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात त्यांच्या वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्याचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.
सरपंच विजय गुरव यांना मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्या समर्थकांनी जोरावर मारहाण केली. भोसले गटाच्या समर्थकांनी सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप केलाय. तर देवस्थान समितीच्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीरपणे ट्रस्टीची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याचबरोबर कार्याध्यक्षांची नेमणूकही बेकायदेशीर झाली आहे, असा गंभीर आरोप सरपंच विजय गुरव यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | नात्याला काळीमा ! पैशासाठी पतीनेच पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले