लोणी काळभोर, (पुणे) : खेड -शिवापूर (Khed – Shivapur) परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा ( local crime branch) व राजगड पोलिसांनी (Rajgad police) केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ५५ लाख ६२ हजार रुपयांचा गुटखा गोडावूनमधून (Gutkha from Godavon) जप्त (confiscation) करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (Avinash Shilimkar) यांनी दिली आहे. (Pune Crime News)
६५ लाख १८ हजार रुपये किमतीचा संबंधित मुद्देमाल जप्त
याप्रकरणी रमेश चौधरी (सध्या रा. श्रीरामनगर, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५५ लाख ६२ हजार ९१२ रुपये किमतीचा पानमसाला, गुटखा, सुगंधी मसाला, तीन लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम त्याचबरोबर ६ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण ६५ लाख १८ हजार रुपये किमतीचा संबंधित मुद्देमाल पंचनामा करून तत्काळ जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम एका चारचाकी गाडीत गुटखा बाळगून असल्याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर सापळा रचून माहिती मिळालेल्या गाडीची तपसणी केली.
यावेळी गाडीतून एक गुटख्याचे पोते मिळून आले. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा माल हा शिंदेवाडी येथील गोडावून मधून आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन ठिकाणच्या गोडावूनमधून नमसाला, गुटखा, सुगंधी मसाला, व तंबाकू असा ५५ लाख ६२ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपीचे दोन मोबाईल फोन, चारचाकी गाडी, रोख रक्कम असा ६५ लाख १८ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीला पुढील तपासासाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवारपर्यत रिमांड कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार संतोष तोडकर, राहुल कोल्हे, सागर गायकवाड, अजित भुजबळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी हे करीत आहेत.