लोणी काळभोर, (पुणे) : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळयात लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर हे दागिने खरेदी करणाऱ्या एका आरोपीलाहि अटक केली आहे.
शंकर शिवाजी पवार (वय-२३), महेंद्र सुरेश अरगडे (वय- २६), नितीन छगन काकडे (वय- २२ रा.तिघेही, रा. पाथर्डी जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत छगन टाक (वय- २६, रा- पाथर्डी अहमदनगर) असे दागिने खरेदी करणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे २४ तोळे वजनाचे १२ लाख २४ हजार रुपये किमतीचे दागिने, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा १३ लाख ५४ हजार रुपयांचा माल जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यातुन पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्या गर्दीचा गैरफायदा घेवुन लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे दोघेजण आळंदी पुणे रोडवर थांबले असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकारी व अंमलदारांणा एका खबऱ्याकडून मिळाली होती.
वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट ६ चे पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नितीन काकडे हा साथीदार असून चोरलेले दागिने प्रशांत टाक याला विकल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपी प्रशांत टाक याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे २४ तोळे वजनाचे १२ लाख २४ हजार रुपये किमतीचे दागिने, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा १३ लाख ५४ हजार रुपयांचा माल जप्त केले. तसेच आरोपीकडुन पुणे शहरात व पिंपरी चिंचवड परिसरात १६ चैन जबरी चोरीचे गुन्हे व २ चैन चोरीचे गुन्हे असे एकुण १८ गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलिस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठठल खेडकर, रमेश मेमाने, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.